बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप..

Distribution of appointment letter to employees


By nisha patil - 1/27/2025 3:38:42 PM
Share This News:



 महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न अखेर मार्गी निघाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यातील ४९० कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आलंय.

महापालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून गेली अनेक वर्षे ५०७ कर्मचारी काम करत होते. दररोज ५६६ रुपये याप्रमाणे दरमहा त्यांना अत्यंत कमी वेतन मिळत होते. ३० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केलाय. हे कर्मचारी आता कायम सेवेत आल्याने त्यांच्या वेतनाबरोबरच इतर सवलतीचांही त्यांना लाभ मिळणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप..
Total Views: 51