बातम्या
जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक (महिला) भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे
By nisha patil - 2/28/2025 8:50:40 PM
Share This News:
जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक (महिला) भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे
कोल्हापूर,: जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती 2023-24 आरोग्य सेवक (महिला) उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसून भरती प्रक्रिया शासन निर्णयानुसार व पुर्णपणे पारदर्शी पद्धतीने राबविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक (महिला) सरळसेवा भरती सन 2023-24करीता दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या निवड समितीमध्ये सामाजिक समांतर आरक्षण अंतर्गत उपलब्ध उमेदवारांपैकी 246 उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले आहे. दोन उमेदवारांनी अर्जामध्ये अंशकालीन प्रवर्गाची निवड केली होती. कागदपत्र पडताळणी दरम्यान अंशकालीन कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे या उमेदवारांना अपात्र करण्यात आले होते. या उमेदवारांनी गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात निवड होत असल्याने खुल्या प्रवर्गातून पात्र करण्याबाबत विनंती केली होती. शासन निर्णयानुसार सामाजिक आरक्षण अंतर्गत प्रथम समांतर आरक्षणा शिवाय पदांचा विचार करुन नंतर समांतर आरक्षणातून पदे भरावयाची आहेत.
त्यानुसार दि. 7 जानेवारी 2025 रोजीच्या निवड समितीमध्ये या दोन उमेदवारांचे गुणानुक्रमे खुल्या प्रवर्गात निवड होऊ शकत असल्याने या उमेदवारांना अंशकालिन उमेदवार म्हणून निवड न करता गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड समितीने पात्र ठरविले आहे.
जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक (महिला) भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे
|