बातम्या
मुरगूडमध्ये जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा
By nisha patil - 1/31/2025 7:37:39 PM
Share This News:
मुरगूडमध्ये जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा
मुरगूड: शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी मुरगुड विद्यालयाच्या पटांगणात जिल्हास्तरीय निमंत्रित हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते होईल. बक्षीस वितरण सोहळा 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्या शुभहस्ते होईल. स्पर्धेचे संयोजक राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आहेत.
मुरगूडमध्ये जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा
|