बातम्या
जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे बेघर महिलांना मदतीचा हात
By nisha patil - 3/25/2025 6:31:22 PM
Share This News:
कोल्हापूर : जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे कोल्हापूर येथील एकटी बेघर महिला संस्था मधील जवळपास २० महिलांना मदतीचा हात पुढे केला. या महिलांना साड्या, जीवनोपयोगी वस्तू आणि किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपच्या अध्यक्ष सौ. सुप्रिया सुनील शिंदे, उपाध्यक्ष सौ. छाया रेणुसे, सौ. तेजस्विनी देशपांडे, सौ. सारिका हिरेमठ, कल्पना बडकस आणि सौ. भाग्यश्री सोडसे या सदस्य उपस्थित होत्या.

संस्थेच्या वतीने या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महिलांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागर स्त्री शक्ती ग्रुपकडून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. भविष्यातही अशा स्वरूपाचे उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे ग्रुपच्या सद
स्यांनी सांगितले.
जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे बेघर महिलांना मदतीचा हात
|