शैक्षणिक
एआयची भीती नको, नवी कौशल्ये शिका - 'फारमिस्टा'चे को-फाउंडर निधीशदास थावरत यांचे आवाहन
By nisha patil - 3/31/2025 2:44:17 PM
Share This News:
एआयची भीती नको, नवी कौशल्ये शिका - 'फारमिस्टा'चे को-फाउंडर निधीशदास थावरत यांचे आवाहन
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डाटा सायन्स विभागाने आयोजित केलेल्या 'द ग्रेट निंजा हॅकेथॉन' स्पर्धेत हैदराबादच्या वर्धमान कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकावर सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर तिसऱ्या क्रमांकावर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ राहिला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी 'फारमिस्टा'चे को-फाउंडर निधीशदास थावरत यांनी ए.आय. च्या भविष्यातील संधी आणि नव्या कौशल्यांच्या महत्त्वावर भाष्य केले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संकेत पाटीलच्या 'विराट'वरील पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
एआयची भीती नको, नवी कौशल्ये शिका - 'फारमिस्टा'चे को-फाउंडर निधीशदास थावरत यांचे आवाहन
|