शैक्षणिक
सेवा करण्याची संधी सोडू नका – डॉ. बी. एम. हिर्डेकर
By nisha patil - 4/3/2025 5:03:54 PM
Share This News:
सेवा करण्याची संधी सोडू नका – डॉ. बी. एम. हिर्डेकर
कोल्हापूर (4 मार्च) – डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रमसंस्कार शिबीर निगवे खालसा येथे संपन्न झाले. समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना "समाजाची सेवा करण्याची संधी कधीही सोडू नका" असे आवाहन केले.
शिबिराच्या कालावधीत स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, योग प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक व्याख्याने, पाककला व बेकरी प्रशिक्षण, तसेच चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक अद्वैत राठोड, प्राचार्य रुधीर बारदेसकर, सरपंच ज्योती कांबळे, उपसरपंच शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य रुधीर बारदेसकर, प्रा. रुबेन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.
सेवा करण्याची संधी सोडू नका – डॉ. बी. एम. हिर्डेकर
|