विशेष बातम्या
विशाळगडावरील मलिक रेहान दर्गा जमिनी दोस्त करा - हिंदू एकता आंदोलन
By nisha patil - 1/23/2025 2:07:00 PM
Share This News:
विशाळगडावरील मलिक रेहान दर्गा जमिनी दोस्त करा - हिंदू एकता आंदोलन
विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच तापलाय. हिंदू एकता आंदोलन संघटनेने विशाळ गडावरील अतिक्रमण व मलिक रेहान दर्ग्याचा मुद्दा धरत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलय. विशाळगडावरील मलिक रेहान दर्ग्यावर बुलडोझर फिरवा, उर्वरित अतिक्रमणे लवकरात लवकर काढा, बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभूंची स्मारके बांधा अशा मागण्या करण्यात आल्यात.
दरम्यान याप्रसंगी बोलताना हिंदू एकता आंदोलन समितीचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी विशाळ गडावरील दर्ग्याची बाबरी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलाय.
दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय.या ठिय्या आंदोलनावेळी हिंदु एकता आंदोलनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
विशाळगडावरील मलिक रेहान दर्गा जमिनी दोस्त करा - हिंदू एकता आंदोलन
|