बातम्या
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ बालरोग विभागाचे उद्घाटन
By nisha patil - 2/28/2025 5:18:23 PM
Share This News:
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ बालरोग विभागाचे उद्घाटन
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘चाईल्ड फ्रेंडली’ बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील आणि अॅडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले.
१०० बेडच्या या विभागात ६० बेडचा जनरल शिशु विभाग, ३० बेडचा नवजात शिशु विभाग आणि १० बेडचा अतिदक्षता विभाग उपलब्ध आहे. थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी डे-केअर सुविधा तसेच अत्याधुनिक व्हेंटीलेटर्स, एमआरआय, सिटी स्कॅन व विविध शस्त्रक्रिया माफक दरात उपलब्ध असल्याची माहिती बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांनी दिली.
उद्घाटन प्रसंगी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ बालरोग विभागाचे उद्घाटन
|