ताज्या बातम्या
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाचा कार्यभार डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे
By nisha patil - 2/20/2025 6:29:32 PM
Share This News:
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाचा कार्यभार डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे
मुंबई (दि. २०) – राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह ते ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
कार्यभार स्वीकारताना कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यावर भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या आणि लोकहिताच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी सहकाऱ्यांना दिले.
डॉ. देशमुख यांनी यापूर्वी कोकण विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, साखर आयुक्त आणि हाफकीन इन्स्टिट्यूटचे संचालक या पदांवर यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे उपमुख्यमंत्री कार्यालय अधिक गतिमान आणि सकारात्मक पद्धतीने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाचा कार्यभार डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे
|