बातम्या
डॉ. प्रल्हाद माने यांची राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी निवड
By nisha patil - 4/2/2025 1:46:40 PM
Share This News:
डॉ. प्रल्हाद माने यांची राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर, दि. ४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड केली आहे. डॉ. माने यांच्याकडे मध्य प्रदेश, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील सात विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी पूर्वीही या स्पर्धेचे परीक्षक आणि समूह समन्वयक म्हणून काम केले आहे.
डॉ. प्रल्हाद माने यांची राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी निवड
|