बातम्या
डॉ. संजय.डी.पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ..
By nisha patil - 2/15/2025 7:55:29 PM
Share This News:
डॉ. संजय.डी.पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ..
नोबेल पारितोषिक विजेते डॉ.कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती ...
शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात येत असल्याची माहिती डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर. के. मुदगल, डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर. के .प्रथापन व कार्यकारी संचालक डॉ. ए. के .गुप्ता यांनी दिली.
डॉ. संजय.डी.पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ..
|