बातम्या
किरकोळ वादातून दुकानात कोयत्याने दहशत, तिघांचा शोध सुरू
By nisha patil - 10/1/2025 2:52:41 PM
Share This News:
किरकोळ वादातून दुकानात कोयत्याने दहशत, तिघांचा शोध सुरू
पुण्यात कोयत्याच्या हल्ल्यांचे प्रकार सुरू असतानाच कोल्हापुरातील वारे वसाहतीतही अश्याच प्रकारची घटना घडलीय. किरकोळ वादातून तिघा तरुणांनी दुकानात शिरून कोयत्याने दहशत माजवत तोडफोड केलीय. या हल्ल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला असून गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केलीय.
पुण्यात कोयत्याच्या हल्ल्यांचे प्रकार सुरू असतानाच कोल्हापुरातील वारे वसाहतीतही अशाच प्रकारची घटना घडलीय. किरकोळ वादातून तिघा तरुणांनी दुकानात शिरून कोयत्याने दहशत माजवत तोडफोड केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, खेमाराम पुनाराम चौधरी यांच्या दुकानात एका लहान मुलाला हटवण्यावरून वाद सुरू झाला. वादानंतर चार-पाच जण निघून गेले, परंतु काही वेळातच दोन ते तीन तरुण शस्त्रे घेऊन दुकानात आले. त्यांनी कोयत्याने दुकानातील वस्तूंवर प्रहार करत बरण्या फोडून टाकल्या. दुकानातील महिलांनी हाती झाडू घेऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
दुकानदारांवरही हल्ला झाल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. ऋत्विक साठे, यश माने, आणि मंथन या तिघांनी दहशत माजवल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला असून स्थानिकांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केलीय.
किरकोळ वादातून दुकानात कोयत्याने दहशत, तिघांचा शोध सुरू
|