विशेष बातम्या
शनिवारी ‘अर्थ अवर’: कोल्हापुरात एक तास स्ट्रीट लाईट बंद
By nisha patil - 3/21/2025 4:45:05 PM
Share This News:
शनिवारी ‘अर्थ अवर’: कोल्हापुरात एक तास स्ट्रीट लाईट बंद
WWF च्या आवाहनाला प्रतिसाद, २२ मार्च रोजी शहर अंधारात
महापालिकेचा सहभाग, स्ट्रीट लाईट आणि विद्युत पुरवठा तासभर बंद
वर्ल्ड वाईल्ड फंड (WWF) च्या आवाहनानुसार २२ मार्च २०२५ रोजी 'अर्थ अवर' उपक्रम साजरा केला जाणार आहे. संध्याकाळी ७:३० ते ८:३० या दरम्यान संपूर्ण शहरातील स्ट्रीट लाईट आणि विद्युत उपकरणे एक तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेनेही या उपक्रमात सहभाग घेतला असून, महावितरण शाखांना विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमामुळे ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृती होणार आहे.
शनिवारी ‘अर्थ अवर’: कोल्हापुरात एक तास स्ट्रीट लाईट बंद
|