शैक्षणिक

विवेकानंदच्या बॉटनी विभाग विद्यार्थ्यांची कृषी महाविद्यालयास शैक्षणिक भेट

Educational visit of Vivekananda Department


By nisha patil - 1/16/2025 2:56:57 PM
Share This News:



विवेकानंदच्या  बॉटनी  विभाग  विद्यार्थ्यांची कृषी  महाविद्यालयास शैक्षणिक  भेट

 कोल्हापूर दि.16 : विवेकानंद कॉलेजमधील बी. एस्सी.भाग 3 बॉटनी (वनस्पतीशास्त्र) विभागातील विद्यार्थ्यांनी कृषी विभागातील विविध विभागांची माहिती घेण्यासाठी कृषी महाविद्यालयास भेट दिली.   सदरची भेट विवेकानंद कॉलेज व एलेक्झिट इन्ग्रेडिएंटस, कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. 

या भेटी अंतर्गत तेथील अधिकारी डॉ.कारंडे, डॉ. सरवदे, डॉ. पतंगे व डॉ. पाटील व त्यांच्या विभागातील विद्यार्थ्यांनी जैविक खतनिर्मिती, गांडुळ खत निर्मिती, डेअरी प्रॉडक्ट् तसेच फळांपासून निर्माण केलेले विविध पदार्थ व त्यांची पाककृती याबद्दल माहिती विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिली.   प्रा.डॉ.अभिजीत कासारकर यांनी आयोजन या भेटीचे आयोजन  केले  होते. या भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार , वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.बी.टी.दांगट, रजिस्ट्रार श्री आर बी जोग यांचे मार्गदर्शन लाभले. 


विवेकानंदच्या बॉटनी विभाग विद्यार्थ्यांची कृषी महाविद्यालयास शैक्षणिक भेट
Total Views: 126