बातम्या

अठरा वर्षीय ॲथलीटवर 58 जणांचा बलात्कार..

Eighteen year old athlete was raped by 58 people


By nisha patil - 1/16/2025 4:11:23 PM
Share This News:



अठरा वर्षीय ॲथलीटवर 58 जणांचा बलात्कार..

देशाला हादरवणारी घटना कुठे घडली पहा

केरळमधील एका 18 वर्षीय दलित ॲथलीटवर गेल्या 5 वर्षांत 58 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना देशाला हादरवून गेली होती. पोलिसांनी तपासानंतर 44 जणांना अटक केली आहे.तपासात अनेक धक्कादायक खुलासेही झाले आहेत.

केरळ मधील 18 वर्षे दलित ऍथलेट वर गेल्या पाच वर्षात 58 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून देशाला या घटनेने सुन्न केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडितेच्या बालपणीच्या मित्राने याची सुरुवात केली होती. अहवालानुसार, लैंगिक अत्याचार करणाऱ्या 58 पैकी 44 लोक हे त्याच दलित वसाहतीतील किंवा पीडित महिला राहत असलेल्या जवळपासच्या भागातील होते.या प्रकरणी 4 पोलिस ठाण्यात पॉक्सो आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत 29 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुबिन हा पीडितेचा बालपणीचा मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. ती 13 वर्षांची असताना अत्याचाराला सुरुवात झाली.सुबिन आणि पीडितेचे घर जवळच होते. दोघेही बालपणीचे मित्र होते. सुबिनने आधी पीडितेला त्रास दिला आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. यानंतर त्याने याचा वापर करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.


अठरा वर्षीय ॲथलीटवर 58 जणांचा बलात्कार..
Total Views: 362