बातम्या
नव्या पिढीला प्रोत्साहन द्या : मा .आ. सुजित मिणचेकर
By nisha patil - 11/1/2025 2:48:48 PM
Share This News:
नव्या पिढीला प्रोत्साहन द्या : मा .आ. सुजित मिणचेकर
जय हनुमान सहकारी दूध संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन.. आ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते शुभेच्छा
: "मौजे वडगाव येथील जय हनुमान सहकारी दूध संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी गोकुळ दूध संघाचे संचालक आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
मौजे वडगाव येथील जय हनुमान सहकारी दूध संस्थेचा नूतन इमानितीचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी बोलताना आमदार मिणचेकर म्हणाले की, गेली सतरा वर्षे संस्थेने दूध संकलनाद्वारे गावातील दूध उत्पादकांना चांगली सेवा दिली आहे. यापुढेही ही सेवा कायम ठेवून म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नव्या पिढीला दूध व्यवसायाकडे वळवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी चेअरमन अरुणकुमार डोंगळे, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, संचालक विश्वासराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते."
नव्या पिढीला प्रोत्साहन द्या : मा .आ. सुजित मिणचेकर
|