बातम्या

निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणं ठरलं जीवघेणं...

Enjoying the beauty of nature has become life


By nisha patil - 6/8/2024 7:04:38 PM
Share This News:



 निसर्ग सौंदर्य पाहणं कुणाला आवडत नाही,तरुण वर्ग निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी  धबधबा नदी, ओढा आणि पाणी असलेल्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाते. मात्र, यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याशी खेळते, फोटो आणि सेल्फीच्या नादात दरी-खोऱ्यात उतरते, डोंगरांच्या कठड्यावर बसून शूट करते. त्यातून, अनेक जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत.नांदेड शहराजवळील एका खदानी बुडून बारावीत शिकत असणाऱ्या  4 मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.नांदेड  शहराजवळच्या झरी येथील खदानीत बुडून चार युवकाचा मृत्यु झाल्याची दु:खद घटना घडली. हे सर्वच मित्र शहरातील देगलुर नाका भागातील रहिवासी होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहिम सुरू केली होती. 
     

   पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आज पाच मित्र फिरायला म्हणून झरी या ठिकाणी आले होते. त्यावेळी, फोटो काढण्यासाठी पाचजण खदानीत खाली उतरले. फोटो काढल्यानंतर पाच पैकी 4 जण पाण्यात उतरुन पाण्यात पोहोण्याचा, अंघोळ करण्याचा आनंद घेत होता. मात्र, खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही  मित्र खदानीत बुडाले. त्यांनंततर, त्यांच्यासोबत गेलेल्या तरुणाने ही माहिती नातेवाईकाना कळवली. त्यानंतर, नातेवाईक व परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली.
       

 अग्निशमन दल आणि गोदावरी जीव रक्षक दलाच्या जवानानी दोन तास शोध घेऊन चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी खदानीजवळच टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनं नांदेड जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणं ठरलं जीवघेणं...