बातम्या
"कंपन्यांची सामाजिक जबाबदारी या संकल्पनेची व्याप्ती वाढणे सामाजिक हिताचे" -हितेश गोयल
By nisha patil - 6/25/2024 1:30:16 PM
Share This News:
सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग व सोशल ॲक्शन फॉर रिफॉर्म या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ड्रायव्हिंग चेंज : क्रिएटिंग सोशल इम्पॅक्ट थ्रू सी एस आर या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचा प्रसंगी बोलताना, गोवा सरकारचे सी एस आर कन्सल्टंट श्री. हितेश गोयल यांनी वरील उद्गार काढले. त्यांनी सी एस आर कायदा 2013 आणि त्यामधील तरतुदी, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करून कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही स्थिमित नसून, याची व्यापकता मोठी असून, राज्यातील व देशातील विविध कंपन्या सी एस आर च्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवत असून यासोबतच व्यापकता वाढविल्यास अधिक चांगला परिणाम दिसू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतामध्ये कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही संकल्पना नवीन नसून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. सध्याच्या काळात फक्त त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ही संकल्पना अनिवार्य स्वरूपात सर्वांसमोर प्रकर्षाने येत राहिली आहे.
कार्यशाळेचा दुसरा सत्रात सोशल ॲक्शन फॉर रिफॉर्म या संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंकज कुमार दास यांनी सी एस आर ऍक्टिव्हिटी ची परिणामकता कशी मोजली जाते व यामध्ये तरुणांचा सहभाग कसा दिला जाऊ शकतो या विषयावर विस्तृतपणे मांडणी केली.विशेष करून विविध अशासकीय संस्थांना सी एस आर चे उपक्रम राबविण्यासाठी संधी दिली जात असून या मार्गातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे, नमूद केले. यासोबतच त्यांनी विशेष करून प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांनी सी एस आर संकल्पना व त्याची अंमलबजावणी याबाबत सखोल प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे नमूद करून हा एक समाज विकासाचा चांगला मार्ग असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
कार्यशाळेची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते तुळशीचे रोप लावून करण्यात आली. डॉ. सोनिया रजपूत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक भोसले यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी यांना एक वेगळाच दृष्टिकोन लाभण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे प्रास्ताविकात नमूद केले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने सायबर मधील श्री. चेतन खटावणे यांच्या संग्रही असलेल्या सुमारे 100 हून अधिक विविध पेनांच्या संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला देखील सहभागी सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला या कार्यशाळेप्रसंगी किर्लोस्कर कंपनीचे सी एस आर अधिकारी श्री.शरद आजगेकर डॉ. दुर्गेश वळवी सी पी आर हॉस्पिटलचे मकरंद चौधरी,पिराजी तोडकर,शरद माळी, जीवरक्षक दिनकर कांबळे, डॉ. बरकत मुजावर,डॉ.उर्मिला दशवंत इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका बुरांडे आणि पूर्वा सावंत यांनी केले.कार्यशाळेचा आढावा डॉ. सुरेश आपटे यांनी घेतला व आभार प्रदर्शन डॉ. कालिंदी रानभरे यांनी केले.
कार्यशाळेसाठी सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. रणजीत शिंदे,सचिव सीए श्री.ऋषिकेश शिंदे, संचालक डॉ.एस पी रथ यांचे मार्गदर्शन लाभले,तर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मोहन तायडे, स्मिता कांबळे, रितेश कांबळे, नेहा सूर्यवंशी,वैष्णवी जगताप, रोहिणी नागसेन, रेशमा कांबळे यांनी परिश्रम घेतले.
"कंपन्यांची सामाजिक जबाबदारी या संकल्पनेची व्याप्ती वाढणे सामाजिक हिताचे" -हितेश गोयल
|