विशेष बातम्या
कोरगांवकर संकूलात प्रवेशाची गुढी
By nisha patil - 3/30/2025 11:57:57 PM
Share This News:
कोरगांवकर संकूलात प्रवेशाची गुढी
कोल्हापूर :मराठी महिन्यातील हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडवा या सणास ओळखले जाते . सोने,चांदी अशा मौल्यवान दागिन्यांबरोबरच विद्यार्थी प्रवेश मुहूर्ताचा देखील याच दिवशी साधला जातो या दिवसाचे औचित्य साधून सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर संकुला मधील साने गुरुजी बालकमंदिर, सावित्री श्रीधर विद्यालय आणि कोरगावकर हायस्कूल येथे आज प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग दिसून आली .
पालकांचे आणि बालकांचे यावेळी पेढा देऊन स्वागत करण्यात आले . साने गुरुजी बालकमंदिर आणि सावित्री श्रीधर विद्यालय या शाळांमध्ये एकूण बारा विद्यार्थ्यांची मुहूर्तावर प्रवेश नोंदणी झाली . या प्रवेश मोहिमेसाठी साने गुरुजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सारिका ढेरे, उपशिक्षिका संगीता माने तसेच सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संकपाळ, चेतन रावळ सचिन कांबळे, कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, हेमलता पाटील, प्रभू प्रसाद रेळेकर यांचेसह तीनही ज्ञानशाखांचे बहुसंख्य शिक्षक प्रवेश प्रक्रियेसाठी हजर होते . या प्रवेशासाठी या तिन्ही ज्ञान शाखेतील शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन आणि सर्वेक्षण केले होते या पार्श्व भूमीवर विविध शाळांना चांगला प्रतिसाद मिळाला .
शहरातील विविध शाळांमध्ये गुलाब पुष्प आणि पुष्पवर्षाव होण्याबरोबरच प्रवेशोत्सुक बालकास खाऊ आणि पालकांना चहापानाची व्यवस्था केलेली पहावयास मिळाली . नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु होत असले तरी केवळ प्रवेश फॉर्म, बालकाचे तसेच पालकांचे आधार कार्ड भरून घेऊन आज प्रवेश निश्चित करण्यात आले . एकंदरीत घरी पाडवा सणाची लगबग असतानाही आपल्या पाल्याच्या उज्जवल भविष्या प्रती महिला पालकांची विशेष धडपड दिसून आली त्यामुळे पाडव्याचा गोडवा अधिकच द्विगुणीत झाला.
कोरगांवकर संकूलात प्रवेशाची गुढी
|