बातम्या

चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री…

Entry of HMPV virus from China into India


By nisha patil - 6/1/2025 12:32:02 PM
Share This News:



 चीनचा एचएमपीव्ही व्हायरस हा भारतात पोहोचला असुन  पहिली केस बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आलीय. बेंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एचपीव्हीची लागण झालीय. तिची लक्षणे त्याच दिशेने  दिसताच एका खासगी रुग्णालयाने ही चाचणी केलीय. ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळलीय.

चीनचा एचएमपीव्ही व्हायरसची लागण वेगाने होतेय. आता अखेर भारतात पोहोचला असुन बेंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एचपीव्हीची लागण झालीय. तिची लक्षणे त्याच दिशेने  दिसताच एका खासगी रुग्णालयाने ही चाचणी केलीय. ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळलीय. फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचे आहेत. फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचे आहेत.

एचएमपीव्ही हा आरएनए विषाणू आहे. जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतोय. हा विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणात असतो, परंतु हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो.


चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री…
Total Views: 75