बातम्या

"हरित क्रांतीचा वसा: यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाचा अभिनव उपक्रम"

Establishment of Green Revolution


By nisha patil - 1/22/2025 11:17:26 AM
Share This News:



"हरित क्रांतीचा वसा: यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाचा अभिनव उपक्रम" th 

कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाचा सामाजिक उपक्रम

डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेऊन महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे. महावीर कॉलेज ते डी.एस.पी. चौक या मार्गावरील झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम विद्यालयाने हाती घेतला आहे.

या उपक्रमात मुख्याध्यापिका कु. गौतमी अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला डॉ. संजय डी. पाटील (अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर), उपाध्यक्ष मा. सतेज डी. पाटील, तसेच विश्वस्त मा. आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी शाळेतील स्नेहा राणी साखळकर, रामराजे सुतार, नीता पाटील, शर्मिला पाटील, दत्तात्रय चौगुले, वैशाली गावडे, शितल भांगरे, संदीप कांबळे, अर्जुन वायाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शाळेने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलले असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली आहे.


"हरित क्रांतीचा वसा: यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाचा अभिनव उपक्रम"
Total Views: 61