शैक्षणिक

कॉपी झाल्यास परीक्षा केंद्र कायमचे रद्द...

Exam center permanently canceled if copied


By nisha patil - 7/2/2025 1:07:57 PM
Share This News:



कॉपी झाल्यास परीक्षा केंद्र कायमचे रद्द...

दहावी व बारावी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी परीक्षेत जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत . त्याचबरोबर संवेदनशील केंद्राचे ड्रोनमार्फत चित्रीकरण केले जाणार आहे. तसेच कॉपी झालेले केंद्र कायमचे रद्द होणार आहे.

यंदाच्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी परीक्षेत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली.  त्यानुसार गैरप्रकारास उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि गैरप्रकारात सामील अशांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत. संवेदनशील केंद्राचे ड्रोनमार्फत चित्रीकरण केले जाणार आहे.

तसेच कॉपी झालेले केंद्र कायमचे रद्द होणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या 34 तर बारावीच्या 23 परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी इतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून नेमण्यात आलेत. शिवाय ही परीक्षा पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आलीय. याप्रसंगी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव ऑनलाईन उपस्थित होते.


कॉपी झाल्यास परीक्षा केंद्र कायमचे रद्द...
Total Views: 53