बातम्या

पन्हाळा पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी..

Excellent performance of Panhala Police Station


By nisha patil - 1/13/2025 3:24:56 PM
Share This News:



पन्हाळा पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी..

 शेळी-मेढ्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक

पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शेळी-मेढ्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून, २,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींनी पन्हाळा येथील शिंदेवाडी मध्ये 21 मेंढ्या चोरी केल्याचे कबूल केलेआहे.

 पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने शेळी मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून या टोळीने अडीच लाखाचा मुद्देमाल व 21 मेंढ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. राधानगरी तील राशिवडे भागात मेढ्या चोरी केल्याचे कबूल केले आहे.परसराम, मोहम्मद व महबूब या तीन आरोपीच्या टोळीकडून ओमनी वाहन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आला.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.पन्हाळा पोलीस ठाण्याने नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले आहे.


पन्हाळा पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी..
Total Views: 40