बातम्या
विशाळगडप्रकरणी भूमिका स्पष्ट करा
By nisha patil - 8/13/2024 7:14:26 PM
Share This News:
विशाळगडप्रकरणी भूमिका स्पष्ट करा
उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
दोन आठवड्यांसाठी तहकूब
विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईवरून वादंग निर्माण झाले होते. पावसातदेखील प्रशासनाकडून कारवाई केल्याने मुंबई उव्व न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या सुनावणीवेळी सरकारची खरडपट्टी काढली होती. आज न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.
विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी करीत शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथील आयुब कागदी व इतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि अँड. माधवी अध्याप्पन यांच्यामार्फत याचिका प्रश्नांब दाखल केली.
याचिकेवर आज न्यायमूर्ती बी. पी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावर खंडपीठाने महाधिवक्ता बरिंद्र सराफ यांना यावर म्हणणे मांडण्यास सांगितले आणि सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.
विशाळगडप्रकरणी भूमिका स्पष्ट करा
|