बातम्या
गोकुळच्या मोफत मिनरल मिक्चर योजनेला मुदतवाढ
By nisha patil - 2/19/2025 7:27:32 PM
Share This News:
गोकुळच्या मोफत मिनरल मिक्चर योजनेला मुदतवाढ
जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : अरुण डोंगळे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्चर मोफत या योजनेला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेला दूध उत्पादक आणि संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने १ मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ही योजना सुरू राहील. दूध संस्थांनी २५ मार्चपर्यंत पशुखाद्याची मागणी नोंदवावी, ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ व ‘महालक्ष्मी गोल्ड पॅलेट’ या पशुखाद्याचा वापर जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.
गोकुळच्या मोफत मिनरल मिक्चर योजनेला मुदतवाढ
|