बातम्या
५०० रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस
By nisha patil - 1/23/2025 5:59:05 PM
Share This News:
५०० रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस
24 सप्टेंबर 2024 रोजी खरी कॉर्नर इथल्या कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मध्ये पाचशेच्या बनावट मोठा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी बँकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये या पाचशे रुपयांच्या 66 बनावट नोटा संशयित आरोपी अमोल पोतदार याने पत्नीच्या खात्यामध्ये मुलाल भरण्यास सांगितल्याचे उघडकीस आले.
याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता निखिल सरगर या संशयित आरोपीने त्यांना दिल्याचं सांगितलं. गुन्हा उघडकीस आल्यापासून निखिल सरगर हा फरार होता.बुधवारी त्याला मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता या नोटा शिवप्रसाद कदम याच्याकडून घेतल्याचं त्यानं सांगितलं. तिघाही आरोपींना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केलीय. आतापर्यंत त्यांच्याकडून एकूण 86 बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात.
ही कारवाई जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथक प्रमुख संतोष गळवे, प्रशांत घोलप, सतीश बांबरे यांच्यासह पथकाने केलीय.
५०० रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस
|