बातम्या

बोगस सहीच्या आधारे नोकरी देणारे रॅकेट सक्रिय....

Fake signature recruitment racket active


By nisha patil - 1/21/2025 3:01:55 PM
Share This News:



बोगस सहीच्या आधारे नोकरी देणारे रॅकेट सक्रिय.... 

 सीपीआरमधील क्लार्क आणि शिपाईपदाच्या नोकरीच्या आमिषाने दोघांना जिल्हाधिकारी, अधिष्ठातांच्या बोगस सहीने नियुक्ती पत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

विविध प्रकारे पैसा मिळविण्याचा धंदा सीपीआरमध्ये काहीजणांनी सुरू केलाय. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सीपीआर प्रशासनाने केलंय.

सीपीआरमधील क्लार्क आणि शिपाईपदाच्या नोकरीच्या आमिषाने दोघांना जिल्हाधिकारी, अधिष्ठातांच्या बोगस सहीने नियुक्ती पत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विविध प्रकारे पैसा मिळविण्याचा धंदा सीपीआरमध्ये काहीजणांनी सुरू केलाय. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सीपीआर प्रशासनाने केलंय. याबाबत, नागेश कांबळे याने गायत्री वारके यांना महिन्यापूर्वी लिपिकपदाचे, तर अन्य एकाने दिलीप दावणे याला शिपाईपदाचे नियुक्ती पत्र दिले आहे. त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या बोगस सह्या आहेत. बोगस नियुक्ती पत्र घेऊन उमेदवार सीपीआर येथे येथे रुजू होण्यासाठी आले. हे नियुक्ती पत्र पाहून सीपीआर प्रशासनातील अधिकारीही विचारात पडले. या गंभीर प्रकारामुळे सीपीआर हादरून गेले आहे. पोलिसांनी तपास गतीने करून या साखळीचा छडा लावणे गरजेचे आहे.


बोगस सहीच्या आधारे नोकरी देणारे रॅकेट सक्रिय....
Total Views: 68