बातम्या
शेती कर्ज मर्यादा ₹५ लाखांपर्यंत: सरकारचा नवा उपक्रम
By nisha patil - 1/3/2025 8:36:32 PM
Share This News:
शेती कर्ज मर्यादा ₹५ लाखांपर्यंत: सरकारचा नवा उपक्रम
कोल्हापूर, १ मार्च: सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत (MISS) शेती कर्जाची मर्यादा ₹३ लाखांवरून ₹५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 च्या घोषणांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी "शेती आणि ग्रामीण समृद्धीवर अर्थसंकल्पोत्तर वेबिनार" आयोजित करण्यात आला.
या वेबिनारमध्ये शेतकऱ्यांसाठी KCC कर्जाची विनातारण मर्यादा ₹२ लाखांवर नेण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. तसेच, कृषी क्षेत्राच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने 2029-30 पर्यंत अल्प-मुदतीच्या कृषी कर्जाचे लक्ष्य २० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वेबिनार कार्यक्रम बँक ऑफ इंडिया संचालित आरसेटी येथे पार पडला. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रतिसादाची माहिती दिली.
शेती कर्ज मर्यादा ₹५ लाखांपर्यंत: सरकारचा नवा उपक्रम
|