विशेष बातम्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यकर्त्यांची बेफिकिरी

Farmer suicides and politicians apathy


By nisha patil - 3/19/2025 4:42:14 PM
Share This News:



शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यकर्त्यांची बेफिकिरी

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दाहक परिस्थिती: साहेबराव करपे यांचा स्मृतीदिन

१९ मार्च हा प्रगतीशील शेतकरी साहेबराव करपे यांचा स्मृतीदिन. अथक मेहनत करूनही कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडता न आल्याने त्यांनी संपूर्ण कुटुंबासह गांधी आश्रमात जाऊन आत्महत्या केली. ही महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर अनेक सरकारे आली-गेली, पण परिस्थिती मात्र दिवसेंदिवस अधिक गंभीर होत गेली.

📉 दाहक सत्य:
➡ गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रात १५,८२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
कृषीप्रधान देशात ६.४२ लाख हेक्टर तर महाराष्ट्रात ३.२५ लाख हेक्टर पिकाखालील जमीन कमी झाली.
➡ कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाले, पण शेतीने देशाला तारले. तरीही राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुःख जाणवले नाही.

शिवरायांचे शेतकरीप्रेम आणि सध्याच्या राज्यकर्त्यांचा क्रूरपणा

शिवाजी महाराजांसाठी रयतेचे हित हेच राज्याचे हित होते.
शाहिस्तेखान पुण्यावर चालून येत असताना महाराजांनी शेतकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले.
 "शेतकऱ्यांना त्रास होईल असे वागू नका, त्यांच्याकडून विना मोबदला काहीही घेऊ नका", अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या.

पण आजचे राज्यकर्ते? शेतकऱ्यांना जगवण्याऐवजी त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करत आहेत.

 नालायक राज्यकर्त्यांनो, कुठे फेडाल हे पाप?

आज महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनला आहे आणि राज्यकर्ते मात्र औरंगजेबाची कबर, खोक्यांचे आरोप, बोक्या-आका यातच अडकले आहेत.

 "जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढची पिढी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कवट्यांचा हार घालून तुम्हाला जोड्याने हाणल्याशिवाय राहणार नाही!" – राजू शेट्टी


शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यकर्त्यांची बेफिकिरी
Total Views: 47