बातम्या
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला….
By nisha patil - 1/16/2025 3:13:04 PM
Share This News:
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला….
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला
सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने रात्री घरात घुसून अभिनेत्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला असुन सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सैफ अली खानवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आलीय. याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने रात्री घरात घुसून हल्ला केलाय. वांद्रेमधील राहत्या घरात त्याच्यावर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला असुन सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आलेत. पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आलं असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आलीय. आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.
अशातच सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजुन कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आरोपी आधीपासूनच इमारतीच्या आवारात उपस्थित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासाला वेग आला असून तपासासाठी पोलिसांच्या सात टीम दाखल झाल्या आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला….
|