बातम्या
अखेर केजरीवाल यांचा जामीन रद्द
By nisha patil - 6/26/2024 11:24:21 PM
Share This News:
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात सत्र न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. ईडीनं या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. दिल्ली हायकोर्टानं ईडीच्या याचिकेनंतर अरविंद केजरीवालांना जामीन देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केजरीवाल यांच्यावतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. एकदा जामीन मिळाल्यानंतर त्याला स्थगिती दिली नाही पाहिजे. जर, हायकोर्टानं सत्र न्यायालयाचा निर्णय बदलला असेल तर केजरीवाल पुन्हा तुरुंगात गेले असते. मात्र, अंतरिम आदेश जारी करत अरविंद केजरीवाल यांना बाहेर येण्यापासून रोखलं गेलं, असं अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.
अभिषेक मनू सिंघवी यांनी हायकोर्टात जर ईडीची याचिका फेटाळली गेली तर माझ्या अशिलाचा म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या वेळीची भरपाई कशी होणार असा युक्तिवाद केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मत मांडताना म्हटलं की हायकोर्टानं निर्णय लवकर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ईडीच्या वकिलांनी हायकोर्टाचा निर्णय दोन तीन दिवसात येईल असं म्हटलं होतं. त्यानुसार, आज उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामीनप्रकरणी निर्णय दिला. त्यामध्ये, सत्र न्यायालयाने दिलेला त्यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे.
अखेर केजरीवाल यांचा जामीन रद्द
|