बातम्या
– प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग....
By nisha patil - 1/30/2025 7:34:18 PM
Share This News:
प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग....
सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही....
प्रयागराजमधील महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
प्रयागराजमधील महाकुंभमध्ये दोन दिवसापुर्वी चेंगराचेंगरीची होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडलीय .तर ही आग 22 सेक्टर मध्ये बनवलेल्या दहा ते बारा तंबूला लागलीय.ही दुर्घटना घडली तेव्हा सुदैवाने एकही भाविक तंबूत नव्हता. आग लागताच सर्वजणांनी तंबूच्या बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचलीय. ही आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाहीय.
– प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग....
|