बातम्या
कोल्हापुरात जीबीएस चा पहिला बळी..
By nisha patil - 2/14/2025 7:42:52 PM
Share This News:
कोल्हापुरात आता जी बी एस आजाराचा पहिला बळी गेलाय. चंदगड तालुक्यातील गौराबाई गावडे या 60 वर्षाच्या महिलेचा गुरुवारी संध्याकाळी जी बी एस मुळे मृत्यू झालाय. तीन दिवसांपूर्वी गावडे या उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.
त्यांना जीबीएस ची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यांच्यावर प्लाज्मा पेरिसीसचे उपचार सुरू होते मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर गावडे यांचा मृत्यू झाला. सध्या सीपीआर रुग्णालयामध्ये जीबीएस सिंड्रोमचे सात रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचे प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी मिरगुंडे यांनी सांगितले.
दरम्यान या घटनेची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली आहे. आणखीन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात जीबीएस चा पहिला बळी..
|