बातम्या

सांबराची शिकार करणाऱ्या, पाच जणांना अटक; गगनबावडा तालुक्यात खळबळ...

Five arrested for hunting sambar


By nisha patil - 12/8/2024 12:13:35 PM
Share This News:



सांबराची शिकार करणाऱ्या, पाच जणांना अटक; गगनबावडा तालुक्यात खळबळ... 

गगनबावडा : सांबराची शिकार करणाऱ्या, पाच जणांना अटक करण्यात आले आहे..  गगनबावडा वन  विभागाने ही कारवाई केली आहे. शिकार केलेले मृत सांबर या आरोपींच्याकडे आढळून आले आहे.. हे मृत सांबर मादी जातीचे असून ती गर्भवती असल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. शिकारीच्या या घटनेत पाच आरोपींना अटक केली असल्याने गगनबावडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.  तालुक्यातील वन विभागाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.


सांबराची शिकार करणाऱ्या, पाच जणांना अटक; गगनबावडा तालुक्यात खळबळ...