बातम्या
आम आदमी पार्टीच्या वतीने 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्यमनगर येथील कार्यालयात ध्वजारोहण
By nisha patil - 1/27/2025 3:32:15 PM
Share This News:
आम आदमी पार्टीच्या वतीने 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्यमनगर येथील कार्यालयात ध्वजारोहण
देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने उद्यमनगर येथील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिद्धगिरी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर व न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी, कोल्हापूर महानगरपालिका सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये प्रदीर्घ सेवा देणाऱ्या मॅटरनिटी नर्सेस, स्टाफ व आया यांचा सत्कार पार पडला.
कार्यक्रमाला आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम आदमी पार्टीच्या वतीने 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्यमनगर येथील कार्यालयात ध्वजारोहण
|