बातम्या

कोल्हापूर हायकर्सनी सलग बाराव्या वर्षी पन्हाळगड दीपोत्सवाने उजळवला.

For the twelfth year in a row


By nisha patil - 10/29/2024 1:02:00 PM
Share This News:



कोल्हापूर हायकर्सनी सलग बाराव्या वर्षी पन्हाळगड दीपोत्सवाने उजळवला. 

पन्हाळा ता.२९ ऑक्टोबर २०२४ इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी मंदिर याठिकाणी दीपावली च्या पुर्व संध्ये ला कोल्हापूर हायकर्स यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन व पहिला दीप प्रज्वलीत करून या दीपोत्सवास सुरुवात झाली.
 

यावेळी पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पन्हाळा प्रेस क्लब चे अध्यक्ष नितीन भगवान 
तसेच शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी किल्ले पन्हाळगडाचा ईतिहास  अंबरखान्यावरील उपस्थित शिवप्रेमीसमोर मांडला जुन्या बुधवारातील शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्राच्या मर्दानी आखाड्याच्या मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ व 
तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर केली.कोल्हापूर हायकर्सकडून यावर्षी पन्हाळगड ज्येष्ठ नागरिक 
 येथील प्रेस क्लबचे अध्यक्ष नितीन भगवान यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे २०१३पासून सुरु केलेला 'एक सांज पन्हाळगडावर' या अनोख्या उपक्रमाच आयोजन सलग बाराव्या वर्षी यशस्वी रीत्या संपन्न झाले . 

 कोल्हापूर हायकर्स हा वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर दुर्ग संवर्धन व पदभ्रमंती तसेच विविध साहसी क्रीडा विविध प्रकार आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून हा ग्रुप ओळखला जातो 

बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात नेहमीच कोल्हापूर हायकर्स पुढे असतात.

आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या ११ वर्षापासुन पन्हाळा गडावर वसुबारसच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो.दीपोत्सव यशस्वी करण्याकरिता कोल्हापूर हायकर्सच्या सर्व सदस्यांसह अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील, श्रावणी पाटील, राजेंद्र भस्मे रोहित पवार, सूर्यकांत देशमुख,  इंद्रजीत मोरे, विजय ससे, सेजल जाधव, समर्थ जाधव, शुभम घनतडे, सार्थक संकपाळ,  अजिंक्य बेर्डे, अभिजीत परीट,  आरती संकपाळ, स्नेहा जाधव, धनुष जाधव, वृषाली मगदूम, नूतन पाटील, सागर पाटील, अवंती राजहंस, प्रथमेश बेलेकर, दीपक साबळे, पारस राजहंस, अवधूत राजहंस, आर्या मिरजकर, ओवी मिरजकर, नगारजे, नितीन भगवान, रवींद्र धडेल यांचामोलाचा वाटा होता.


कोल्हापूर हायकर्सनी सलग बाराव्या वर्षी पन्हाळगड दीपोत्सवाने उजळवला.