बातम्या

शाहुपुरीत खोट्या दस्तऐवजांच्या आधारे फसवणुकीचा प्रकार; दोन जणांवर गुन्हा दाखल

Fraud based on fake documents in Shahupuri


By nisha patil - 7/3/2025 3:26:05 PM
Share This News:



शाहुपुरीत खोट्या दस्तऐवजांच्या आधारे फसवणुकीचा प्रकार; दोन जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर,  – शाहुपुरी पोलीस ठाण्यात खोट्या दस्तऐवजांच्या आधारे फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उदयकुमार मिताक्षर पाटील (वय ४८, व्यवसाय-नोकरी, रा. व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रताप बाळासाहेब जाधव आणि प्रशांत बाळासाहेब जाधव (दोघेही रा. लक्ष्मीपूरी, कोल्हापूर) यांनी खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

ही घटना ४ एप्रिल २०२२ रोजी शाहुपुरी व्यापारी पेठ आणि महावितरण ग्राहक सेवा केंद्र, ताराबाई पार्क येथे घडली. आरोपींनी फिर्यादीच्या मयत चुलते बापूसाहेब आदगोंडा पाटील यांच्या खोट्या सह्या करून तसेच त्यांच्या नावावर असलेली वीज अनामत रक्कम हडप करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे खोटी शपथपत्रे सादर केली. याशिवाय, कोल्हापूर महानगरपालिकेच्या असेसमेंट उताऱ्यावरून मयत चुलते आणि वडिलांची नावे कमी करण्यासाठी खोटे पुरावे तयार करण्यात आले.

या प्रकारामुळे फिर्यादीची फसवणूक झाली असून, ९६० रुपये अपहार झाल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम १९१, १९२, १९३, १९६, १९९, २०७, ४०४, ४०६, ४१८, ४२०, ४२३, ४६७, ४६८, ४७१ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहुपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वंबरगेकर करत आहेत.


शाहुपुरीत खोट्या दस्तऐवजांच्या आधारे फसवणुकीचा प्रकार; दोन जणांवर गुन्हा दाखल
Total Views: 85