बातम्या

अवैध व्यवसाय,नशिले पदार्थ मुक्त करा : जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी

Free illegal businesses


By nisha patil - 1/28/2025 3:01:21 PM
Share This News:



जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची शिवसेना शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन कोल्हापूर मध्ये चाललेल्या अनेक प्रकारच्या अवैध व्यवसाय संदर्भात व कोल्हापूर नशिले पदार्थ मुक्त करा अशी मागणी करण्यात आलीय. 
 

मटका, गुटखा ऑनलाईन लॉटरी, कॅसिनो कॅफे, मीटिंग पॉइंट ,चंदगड तालुक्यातील शिनोळी गावामध्ये गोव्याच्या धरतीवर राजरोसपणे चाललेला कॅसिनो जुगार आड्या संदर्भात संबंधित डी वाय एस पी यांच्यामार्फत कारवाई करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. 
 

गुन्हे अन्वेषण शाखा व आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या जातात परंतु संबंधित अधिकारी व त्यांचे वर्षानुवर्षे असलेले कर्मचारी या तक्रारींकडे दुर्लक्षित करीत असतात भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये  अवैध व्यवसाय, नशिले पदार्थ या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पुराव्यानशी थेट माझ्याशी संपर्क साधावा त्यांच्यावर कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले.


अवैध व्यवसाय,नशिले पदार्थ मुक्त करा : जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी
Total Views: 98