बातम्या

सीपीआरमधील जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णाची आ. अमल महाडिकांनी घेतली भेट

GBS syndrome patien


By nisha patil - 1/31/2025 7:53:25 PM
Share This News:



पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरातही जीबीएस सिंड्रोमचा रुग्ण आढळलाय. सीपीआर मध्ये उपचार घेत असलेल्या या रुग्णाची आ. अमल महाडिकांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केलीय. यावेळी डॉक्टरांबरोबर झालेल्या चर्चेतून सीपीआर मधील व्हेंटिलेटरची सद्यस्थिती लक्षात आली.

सीपीआर मध्ये उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर पैकी अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत आहेत ते दुरुस्त करून वापरात आणण्याबरोबरच आणखी पाच नवे व्हेंटिलेटर सीपीआरसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत चर्चा करून लवकरच व्हेंटिलेटरची उपलब्धता करण्यात येईल अशी ग्वाही आ. अमल महाडिकांनी दिली.


सीपीआरमधील जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णाची आ. अमल महाडिकांनी घेतली भेट
Total Views: 35