बातम्या

गणेश उत्सव होणार गोड ;त्याला आनंदाच्या शिंद्याची जोड

Ganesha Utsav will be sweet


By nisha patil - 7/13/2024 5:09:46 PM
Share This News:



राज्यातील नागरिकांसाठी गौरी-गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा मिळणार आहे.गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे अवघ्या १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यावेळी द्रारिद्य्ररेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे.
   

लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार असून यासासाठी ५६२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

याबाबत राज्यातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी केला असून  छत्रपती संभाजीनगर  व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतींच्या दरात हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
     आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  अंदाजित ५४३.२१ कोटी तर इतर १९.३ कोटी खर्च असा एकूण ५६२.५१ कोटी एवढा प्रस्तावित खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्याकरता २१ दिवसांऐवजी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा नागरिकांना एक किलो चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा  शिधा देण्यात येणार आहे.


गणेश उत्सव होणार गोड ;त्याला आनंदाच्या शिंद्याची जोड