बातम्या

जाधववाडी परिसरात गांजा विक्री करणाऱ्याची धिंड

Ganja seller busted in Jadhavwadi area


By nisha patil - 8/2/2025 3:47:46 PM
Share This News:



जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ साठा करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जाधववाडी इथ एका घरावर छापा टाकला. गांजा साठा करणाऱ्या अजय राजेंद्र येडगे याला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 60 हजार रुपये  किमतीचा अडीच किलो गांजा जप्त केला. यानंतर पोलिसांनी आरोपी अजय येडगे याची जाधव वाडी कदमवाडी परिसरातून धिंड काढली.  

ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव,शुभम  संकपाळ लखन पाटील,संदीप बेंद्रे विशाल चौगले सागर माने 
संजय कुंभार महेश पाटील अशोक पोवार आदींनी मिळून ही कारवाई केलीय.


जाधववाडी परिसरात गांजा विक्री करणाऱ्याची धिंड
Total Views: 100