बातम्या

कोल्हापुरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांची धिंड

Ganja selling and consuming in Kolhapur


By nisha patil - 7/2/2025 7:36:22 PM
Share This News:



कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांची आज दुपारी धिंड काढलीय.पोलिसांनी गांजा ओढताना शुभम शेलार या तरुणाला ताब्यात घेतलं होत. चौकशीत त्यानं राजारामपुरी मातंग वसाहत इथल्या किरण अवघडे याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती दिली.त्यानुसार पोलिसांनी किरण अवघडे याच्या मातंग वसाहतीमधील घरी छापा टाकत ५५ हजार रूपये किंमतीच्या २ किलो गांजासह अवघडे याला ताब्यात घेतलं.

दरम्यान आज दुपारी पोलिसांनी किरण अवघडे व  शुभम शेलार यांची राजारामपुरी सहावी गल्ली परिसरातून धिंड काढली.

दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी अवैधरित्या अमली पदार्थांचा साठा अथवा विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलंय. 

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहायक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, सुशांत तळप, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सुरेश काळे यांनी केलीय


कोल्हापुरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांची धिंड
Total Views: 91