बातम्या

पाच महिन्यांची बिले न मिळाल्यामुळे कचरा संकलन ठप्प

Garbage collection halted due to non


By nisha patil - 3/18/2025 5:50:25 PM
Share This News:



पाच महिन्यांची बिले न मिळाल्यामुळे कचरा संकलन ठप्प

कचऱ्याचे साम्राज्य पसरण्याचा धोका : ट्रॅक्टर ट्रॉलीमालकांनी काम थांबवले

गेल्या पाच महिन्यांपासुन बिले दिल्या नसल्याकारणामुळे कचरा संकलनासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या १६ ट्रॅक्टर ट्रॉलीमालकांनी आजपासून काम बंद केलंय. त्यामुळे टिप्परशिवाय भागातील रस्त्यावर पडणारा कचरा उठाव होण्यास अडचणी येणार असून, पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य पसरण्याचा धोका निर्माण होतोय. याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागल्याने रस्त्यावरील अखेर कचरा उठाव करण्यासाठी भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर घेण्यात आले. 

त्यांची बिले वेळेत निघाली असती तर हा प्रश्न आला नसता. गेल्यावर्षी ऑक्टोबरदरम्यान बिले मिळाली नसल्याने या ट्रॅक्टर ट्रॉलीमालकांनी काम थांबवले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून जुनी बिले काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी काम सुरू केले, पण त्यानंतरची बिले निघालेली नसल्याने त्या मालकांनी आजपासून काम थांबवले. बिल मिळालेले नसल्याने डिझेलचे बिल देता येत नाही. परिणामी डिझेल नसल्याने ट्रॅक्टर काढता येत नसल्याचे कारण ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे.


पाच महिन्यांची बिले न मिळाल्यामुळे कचरा संकलन ठप्प
Total Views: 22