विशेष बातम्या

शिरोली MIDC मध्ये कचऱ्याचा विळखा – नागरिक, उद्योग आणि रुग्णालये त्रस्त!

Garbage dump in Shiroli MIDC

By nisha patil - 1/3/2025 2:09:21 PM
Share This News:

शिरोली MIDC मध्ये कचऱ्याचा विळखा – नागरिक, उद्योग आणि रुग्णालये त्रस्त!

शिरोली MIDC मधील स्मैक भवन शेजारी प्रचंड कचरा साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे स्मैक, हॉस्पिटल आणि MIDC मधील उद्योगांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कचरा ठिकठिकाणी साचला असून त्या
दुर्गंधीमुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक आणि कामगार यामुळे संतप्त असून तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे!

शिरोली MIDC मध्ये कचऱ्याचा विळखा – नागरिक, उद्योग आणि रुग्णालये त्रस्त!
Total Views: 36