आरोग्य

लसूण हिवाळ्यात खूप महत्वाचे.

Garlic is very important in winter


By Administrator - 1/15/2025 4:49:24 PM
Share This News:



\हिवाळ्यात तुम्ही लसूण भाजण्यासाठी गॅस किंवा ओव्हनचा वापर करू शकता. लसणाचा वरचा भाग थोडा कापून घ्या. त्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल लावून मीठ आणि काळी मिरी लावा. त्यानंतर मंद आचेवर रोस्ट करा आणि एक ते दोन कळ्या खा. लसूण पचल्यानंतर रक्तात विरघळू लागतो यातील तत्वांमध्ये (एलडीएल) बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. 

जे लोक रोज लसूण खातात ते लोक जास्त जगतात. यातून असं दिसून येतं की लसूण वाढत्या वयातील लक्षणं कमी करण्यास मदत होते आणि आजारही दूर होतात.

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांचे मुख्य कारण ब्लड प्रेशर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनच्या रिपोर्टनुसार  हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. लसणातील कंपोनेंट्स ब्लड प्रेशरच्या औषधांप्रमाणेच शरीरावर परिणाम करतात. 

हिवाळ्याच्या दिवसात लसणाच्या पाकळ्यांचे सेवन केल्यास शरीराला बरेच फायदे मिळतात. यातील एंटीइंफ्लामेटरी आणि एंटी ऑक्सिडेंट्समुळे इफेक्ट्स इम्यून सिस्टिम मजबूत राहते आणि सर्दी, खोकल्याची समस्याही उद्भवत नाही. याशिवाय बॅक्टेरिया आणि व्हायरसचा धोका टळण्यास मदत होते. भाजलेला लसूण खाल्ल्याने अल्जायमर, डिमेंशिया दूर होतो, एथलीट परफोर्मेन्स वाढतो, शरीर डिटॉक्स होते आणि हाडांना बळकटी मिळते

लसूण हा एक मसाला आहे जो भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात असतो, जर तो भाज्या किंवा इतर पाककृतींमध्ये टाकला तर टेस्ट वाढते, लसूण गरम होतो आणि त्याचबरोबर त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका टळतो.

नियमित लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. लसूण बी ६ आणि सी जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन बी ६ चयापचयसाठी उपयुक्त आहे. तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील मोलाची भूमिका बजावू शकते.

लसूण खाण्याचे फायदे

* रक्तदाब राहतो नियंत्रणात

* वजन कमी करण्यास होते मदत

* हृदय राहते स्वास्थ

* सर्दी-खोकल्यावरही उपयोगी

* पचनक्रिया सुधारते

* श्वास घेण्याच्या त्रासावर उपयोगी

* कॅन्सरचा धोका होतो कमी

* कोलोस्टेरॉल करते कमी

* मधुमेहाचा धोका होतो कमी

* हिमोग्लोबिन वाढते

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे काहीही न खाता सकाळी लसूण चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होईल.

लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे कंपाऊंड असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या ४ कळ्या खाव्यात.

अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच याचं सेवन केल्यामुळे आपलं शरिर अनेक रोगांशी लढण्यासाठी सुसज्ज होतं.

अंकूर आलेल्या लसणामध्ये एँटी-ऑक्सिंडट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे आपल्या शरिरातील तणाव कमी होतो तसेच आपली त्वचा नेहमी तजेलदार राहते. आपला उत्साह तसेच आपला मूड फ्रेश राहण्यास मदत होते.

जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही कळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल. यामध्ये अशी काही संयुगे आढळतात जी शरीरातील अतिरिक्त चरबी वितळविण्यास मदत करतात.

भाजलेले लसूण खाणे हा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यासाठी एका पातेल्यात लसूण भाजून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करा. अशाप्रकारे उच्च रक्तदाबामध्ये लसणाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. फक्त लक्षात ठेवा दिवसभरात जास्त लसूण खाऊ नका.
 


लसूण हिवाळ्यात खूप महत्वाचे.
Total Views: 116