बातम्या
गौतम गंभीर भारताच्या पराभवानंतर संतापला
By nisha patil - 1/1/2025 11:04:28 PM
Share This News:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना हा मेलबर्न मध्ये खेळवण्यात आला असून पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चांगलाच संतापल्याचं समोर आलंय.
भारत आणि ऑस्ट्रिलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमधील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला असुन या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाच्या या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर चांगलाच संतापल्याचं समोर आलंय. चौथ्या कसोटीतील पराभवानंतर आता पुरे झाले..., असं म्हणत गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारले असुन गंभीरने वरिष्ठ खेळाडूंवरही नाराजी व्यक्त केलीय. ठरलेल्या योजनांचे अनुसरण करण्याऐवजी खेळाडू स्वत:च्या इच्छेनुसार वागत असल्याचे गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममधील बैठकीत सांगितले. तसेच आतापासून रणनीती न पाळल्यास त्यांना 'धन्यवाद असे म्हटले जाईल, असा इशाराही गंभीरने भारतीय खेळाडूंना दिला आहे.
गौतम गंभीर भारताच्या पराभवानंतर संतापला
|