बातम्या

महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : आमदार राजेश क्षीरसागर

Get ready to hoist Shiv Sena

By nisha patil - 3/2/2025 5:05:20 PM
Share This News:

महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, दि. ०३ : शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी "शिवकार्य" उपक्रम राबविण्याचे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले.

५ ते ०९ फेब्रुवारी दरम्यान शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून, यामध्ये शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन, संपर्क कार्यालयांचे उद्घाटन, आणि सभासद नोंदणी कार्यक्रम मुख्य ठरले आहेत.

शिवसेनेचा विचार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम शहरात जोरदार राबविण्याचे त्यांनी आवाहन केले.यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 31