विशेष बातम्या
'घिब्ली' ट्रेंडमुळे डिजिटल प्रायव्हसीला धोका? तज्ज्ञांचा इशारा
By nisha patil - 2/4/2025 3:25:32 PM
Share This News:
'घिब्ली' ट्रेंडमुळे डिजिटल प्रायव्हसीला धोका? तज्ज्ञांचा इशारा
एआय कंपन्या खासगी फोटो गोळा करून त्याचा उपयोग करू शकतात ?
सोशल मीडिया ट्रेंडमध्ये सहभागी होण्याआधी सावधगिरी बाळगा – तज्ज्ञांचे आवाहन
सोशल मीडियावर सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या 'घिब्ली' ट्रेंडबाबत डिजिटल प्रायव्हसी तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिलाय. तज्ज्ञांच्या मते, एआय कंपन्या या ट्रेंडच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे खासगी फोटो गोळा करून त्यांचा उपयोग एआय ट्रेनिंगसाठी करू शकतात.
एकीकडे लोक आपल्या चेहऱ्याचे कार्टून स्वरूप पाहण्यात आनंद घेत असताना, दुसरीकडे त्यांचा फेशिअल डेटा अप्रत्यक्षपणे ओपन एआयकडे सोपवला जातोय. यामुळे भविष्यात मोठा डिजिटल सुरक्षेचा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या साहाय्याने तयार केलेल्या या कार्टून प्रतिमांवर एआय कंपन्यांचा पूर्ण मालकी हक्क असतो. त्यामुळे भविष्यात डिजिटल आर्टिस्ट आणि कार्टून रेखाटन करणाऱ्या कलाकारांसाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. तसेच, वापरकर्त्यांनी अपलोड केलेले फोटो कंपन्या त्यांच्या इच्छेनुसार वापरू शकतात, अशी तज्ज्ञांची चिंता आहे. यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही ट्रेंडमध्ये सहभागी होण्याआधी त्याचा प्रभाव आणि संभाव्य धोके लक्षात घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
'घिब्ली' ट्रेंडमुळे डिजिटल प्रायव्हसीला धोका? तज्ज्ञांचा इशारा
|