बातम्या

शासकीय योजनाच्या माध्यमातून घरोघरी पोहचा : खा. डॉ. श्रीकांत शिंदे

Go door to door through government scheme


By nisha patil - 3/9/2024 9:22:00 PM
Share This News:



लोकसभेचा पूर्वानुभव पाहता विरोधकांकडून घरोघरी जाऊन खोटा अपप्रचार करण्यात आला. पण आता गाफिल न राहता लाडकी बहिण, अन्नपूर्णा अशा लोकहिताच्या योजनेतून घरोघरी पोहचून शिवसेनेचे काम , अशा सूचना शिवसेना संसदिय नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. जैन बोर्डिंग येथील बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनकांशी संवाद साधला.यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याची धास्ती विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे खोटा अपप्रचार करण्याचा डाव या विधानसभा निवडणूकित विरोधकांकडून केला जाऊ शकतो. त्यामुळे गाफिल न राहता शासनाच्या योजनाच्या माध्यमातून घरोघरी पोहचा असं वक्तव्य केलं.


शासकीय योजनाच्या माध्यमातून घरोघरी पोहचा : खा. डॉ. श्रीकांत शिंदे