बातम्या

इचलकरंजीत गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

Goa fake liquor stock seized in Ichalkaranjit


By nisha patil - 11/2/2025 8:29:12 PM
Share This News:



 राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाच्या  पथकाने बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला आहे.आज सकाळी नदीवेश नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत चेतन अनिल कलाल, अजय विश्वनाथ भंडारे, रमेश तानाजी खामकर या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आलिय.त्यांच्याकडून सुमारे सहा लाख 19 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

होंडा कंपनीच्या गाडीच्या डिक्की मधून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या पथकाच्या तपासणीत गाडीच्या डिक्की मध्ये कागदी बॉक्समध्ये विविध ब्रँड्सचा मद्यसाठा आढळून आला. तो जप्त करून तिघा आरोपींना अटक करण्यात आलीय. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विभागाचे निरीक्षक ए एस कोळी, एस वाय इनामदार, एस एस हिंगे यांच्यासह पथकाने केली आहे.


इचलकरंजीत गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
Total Views: 65